पीक नुकसान सूचना
जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा 2019 काढला असेल व पावसामुळे शेतात पाणी साचले असेल किंवा बाजरी, सोयाबीन शेंगा मध्ये कोंब उगवून पिकाची नुकसान झाली असेल कपाशीच्या कैऱ्या सडल्या असतील त्यानी विमा कंपनीला फोन करून क्लेम करावा.
खरीप पिक विमा न्यू अपडेट हे काम करा नाहीतर मिळणार नाही पिक विमा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
खरीप पीक विमा योजना 2019 च्या 22 मे 2019 च्या शासन निर्णय नुसार काढणीनंतर बेमोसमी पावसामुळे होणारे नुकसान हे विम्यास पात्र आहे.
विमा कंपनी ला माहिती कळवली तरच विमा मिळेल ही माहिती विमा कंपनीला 24 तासाचे आत कळवावी लागते तरी जास्तीत जास्त बांधवांनी खालील टोल फ्री क्र वर फोन करावा 1800116515
तसेच नुकसानग्रस्त पिकांच्या अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावा जेणे करून कृषी विभागाच्या वतीने विमा मंजुरी साठी पाठपुरावा करण्यात येईल.
ही माहिती इतर शेतकरी बंधू पर्यंत जास्तीत जास्त शेर करा
0 comments:
Post a Comment