अतिवृष्टी/अवेळी पाऊस यामुळे पिक विमा भरलेल्या काढणी करुन ठेवलेल्या पिकाचे
उपरोक्त विषयान्वये औरंगाबाद जिल्हयात दि.१९-१०-२०१९ पासून सर्वत्र पाऊस चालु असून यामुळे शेतक-यांनी काढणी केलेल्या मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे वेगवेगळयाप्रकारे नुकसान होऊ शकते अशा नुकसानग्रस्त शेतक यांच्या पिकांचे वैयक्तीक पंचनाम्याची तरतूद शासन निर्णयात पुढीलप्रमाणे आहे. तरी शासन निर्णय क्र. प्रपिवियो २०१९ प्रक्र.०१/११ अ दि. २२ मे २०१९ मधील १०.४ व १०.५ मध्ये समाविष्ट आहे. त्यातील तुरतुद क्र. १०.४ व १०.५ प्रमाणे काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही देण्यात आली आहे. आपल्यास्तरावरुन आपल्या तालुक्यात ज्या शेतक यांचे वरील तरतुदीनुसार नुकसान होऊ शकते. अशा सर्व शेतक यांचे वैयक्तीक पंचनामे विमा कंपनीकडून करण्यात येणार आहेत. सदरील पंचनामे करण्यासाठी शेतक यांचा विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२, पिक विमा भरलेल्याची पावती आवश्यक आहे. अशा सर्व शेतक यांनी टोल फ्री क्रमांक १८००११६५१५ भारतीय कृषि विमा कंपनी यांच्याकडे नुकसान झाल्यापासून ७२ तासांत तक्रार करावयाची आहे. किंवा सदरील शेतक यांचे वैयक्तीक अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावरुन एकत्र करुन सदरील यादी विमा कंपनीस पाठवावयाची आहे. तरी आपण आपल्या तालुक्यात पावसामुळे काढणीकेलेल्या पिकाच्या नुकसानीबाबतची माहीती विमा कंपनी व या कार्यालयास दि.२४/१०/२०१९ दपारी ३ :०० पर्यंत देण्यात यावी.
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०१९-२० काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करणे
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०१९-२० काढणी पश्चात नुकसान भरपाई निश्चित करणे
अधिसुचित क्षेत्रातील शेतात कापणी करुन वाळविणेसाठी पडलेल्या अधिसुचित पिकास पिक कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवस चक्रीवादळ अवकाळी पावसा पासून नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याबाबतची तरतुद १०.५ व १०.४ मध्ये स्थानीक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास पुराचे पाणी शेतात शिरुन शेत दिर्घकाळ जलमय राहील्यास व पिकाचे नुकसान झाल्यासची तरतुद शासन निर्णय क्र. प्रपिवियो२०१९ प्रक्र.०१/११ अ दि. २२ मे २०१९ मधील १०.४ व १०.५ मध्ये समाविष्ट आहे.
वरील १०.४ व १०.५ मधील जोखमी अंतर्गत नुकसान भरपाईचे निकष :
१.अधिसुचित विमा क्षेत्रात अधिसुचित पिक घेणा-या सर्व शेतक-यांसाठी सदर तरतुद वैयक्तीक स्तरावर लागू राहील.
२.जास्तीत जास्त दायीत्व हे बाधीत पिकाच्या क्षेत्राच्या विमा संरक्षित रक्कमे एवढे राहील.
३.या अंतर्गत जोखमीचा धोका घडेपर्यंत पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षण रक्कमेच्या आधीन राहून देण्यात येईल.
पिक नुकसानीची माहीती कळविण्याची पध्दती :
१.योजनेत सहभागी झालेल्या शेतक यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आंत याबाबतची सुचना विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक १८००११६५१५ वर देण्यात यावी तसेच जर सदर क्रमांक नाही लागला तर सदरची माहीती संबधित ता.कृ.अ. कार्यालय महसुल विभाग यांना विहित नमुन्यातील अर्जात देण्यात यावी. सदरचे अर्ज महसुल कृषि विभाग हे ४८ तासात विमा कंपनीस पाठवतील. अर्जामध्ये पिक विमा संरक्षित रक्कम, भरलेला विमा हप्ता व त्याचा दिनांक तसेच सर्व्हे नंबर नमुद असावा. त्यानुसार विमा कंपनी वैयक्तीक सर्वेक्षणाकरीता कार्यवाही सुरु करेल.
१.कृषि विभाग विमा भरलेल्या शेतक-यांची सर्व्हे नंबरनुसार बाधीत पिक व बाधीत क्षेत्र बाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आंत संबधित विमा कंपनीस माहीती देईल.
२.सदर माहीती प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी ४८ तासात नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी विमा पर्यवेक्षकाची नियुक्ती करेल.
३.काढणी पश्चात जोखमीकरीता जर बाधीत क्षेत्र हे एकुण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्केपेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्वच पात्र शेतकरी हे काढणी पश्चात नुकसा भरपाई मिळण्यास पात्र राहतील.
महाराष्ट्र शासन जीआर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ⇓
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ⇓
online from link
ReplyDeleteHow to fillup the form online
ReplyDelete